लेटेस्ट न्युज (अद्ययावत) ......... आगामी कार्यक्रम


प.प. श्री गंगाधर तीर्थ स्वामी महाराज प.प.श्री नारायण देव तीर्थ स्वामी महाराज प.प.श्री शंकर पुरुषोत्तमतीर्थ स्वामी महाराज प.प.श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज प.पू.श्री नारायण काका महाराज
प.प. श्री गंगाधर तीर्थ स्वामी महाराज प.प.श्री नारायण देव तीर्थ स्वामी महाराज प.प.श्री शंकर पुरुषोत्तमतीर्थ स्वामी महाराज प.प.श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज प.पू.श्री नारायण काका महाराज
गॅलरी ऑडियो / व्हिडिओ माहिती
गॅलरी ऑडियो / व्हिडिओ माहिती

महायोग


या महायोग साधन परंपरेत साधनाभ्यास करणाऱ्या व या महान परंपरेत सामील होण्याची जिज्ञासा बाळगणाऱ्या सर्वांचे मन:पुर्वक स्वागत.

भारत वर्षात प्राचीन काळापासून महायोगाची परंपरा प्रवाहित आहे. प.प. श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज यांना त्यांच्या सद्गुरूंकडून लाभलेला हा आशिर्वाद अर्थात परंपरेने प.पू. श्री गुळवणी महाराज, प.पू. श्री दत्त महाराज कविश्वर व प.पू. श्री नारायण काका ढेकणे महाराज यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचला आहे. महायोगाची ही दिव्य साधन परंपरा आजतागायत चालू असून ती अनंत काल पुढेही चालत रहाणार आहे.

या महायोग साधनेचे वर्णन Cheapest ( याकरिता पैशाची वा धनाची अपेक्षा नाही ) Simplest ( स्वत: काही करायचे नाही), Highest ( एष योगस्य परमो विधि: ) असे करता येईल. आज भारतातच नव्हे तर जगातील हजारो साधक या महायोगात वाटचाल करत आधिभौतिक, आधिदैविक व आध्यात्मिक अशा तीनही प्रकारच्या शांतीचा अनुभव घेत आहेत.

या मार्गात सामील होण्यासाठी धर्म, जाती, वय, लिंग अशा निरनिराळ्या भेदांना बाजूला ठेवून हे महायोगाचे साधन करू शकतो.

या वेबसाईटच्या माध्यमातून महायोगाची संपूर्ण माहिती, या महायोग परंपरेतील सिध्द पुरुषांचा परिचय , या मार्गात प्रवेश करण्याची प्रक्रिया, नियम व अटी यांची पुर्ण माहिती, सद्पुरुषांचे मार्गदर्शन, काही वाड्मय, प्रवचने, तसेच या केंद्रामार्फत राबवणारे विविध उपक्रम, फोटो व नित्य येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे ( FAQ ) व बरेच काही असणार आहे. यामुळे साधकांची साधना तर वृध्दिंगत होईलच,पण या नवनवीन उपक्रमात सामील होण्याची इच्छा पण होईल ,त्याचबरोबर जिज्ञासूंची जिज्ञासा बळावणार आहे यात शंकाच नाही.

menu