प.प. श्री गंगाधर तीर्थ स्वामी महाराज प.प.श्री नारायण देव तीर्थ स्वामी महाराज प.प.श्री शंकर पुरुषोत्तमतीर्थ स्वामी महाराज प.प.श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज प.पू.श्री नारायण काका महाराज
प.प. श्री गंगाधर तीर्थ स्वामी महाराज प.प.श्री नारायण देव तीर्थ स्वामी महाराज प.प.श्री शंकर पुरुषोत्तमतीर्थ स्वामी महाराज प.प.श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज प.पू.श्री नारायण काका महाराज
गॅलरी ऑडियो / व्हिडिओ माहिती
गॅलरी ऑडियो / व्हिडिओ माहिती

पूर्वाभ्यास..


प.पू.श्री.काका महाराज यांच्याकडून या सिध्दयोग मार्गाचा प्रचार व्हावा ही भगवती मातेचीच इच्छा आहे आणि सर्वऽपि सिध्दयोगदीक्षीता: भवन्तु या उच्च ध्येयाने प्रेरीत होऊन ते, अनेक पध्दतीने, अनेक माध्यमांद्वारे हा मार्ग सर्वापर्यत पोहचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या या उद्देशाने केलेल्या महायोग प्रसार प्रचाराच्या कार्यास भरघोस प्रतिसाद मिळत आहेत. श्रीमदभगवतगीतेमध्ये भगवंताचा एक प्रकारे आदेश म्हणता येईल असा सूचक संदेश आहे..

पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि सः।
जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्मातिवर्तते।। 6.44।।

अर्थात: तो विषयांच्या स्वाधीन झाला असला तरी देखील त्या पूर्वीच्या अभ्यासानेच नि:संदेह या मार्गाकडे ओढला जातो, तसेच या योगाचा जिज्ञासू देखील सकाम कर्मांच्या फलांना ऊल्लंघून जातो.

त्यामुळे ज्यांना महायोगाची दीक्षा घेण्यासाठी नियमांचे पालन करण्यास अवघड जाते व त्यांच्या मनाची तयारी होत नाही व अशा हल्लीच्या धकाधकीच्या वेगवान व स्पर्धात्मक जगात हे महायोगाचे नियम , इच्छा असूनही पाळू शकत नाही अशी अनेक जिज्ञासूंनी आपली खंत प पू.श्री काका महाराज यांच्यासमोर मांडली असता त्यांच्या कल्याणासाठी म्हणून महाराजांनी पूर्वाभ्यासाची आगळीवेगळी संकल्पना समाजासमोर मांडली.

प.पू .श्री.काका महाराज हे नेहमी म्हणायचे की " या भारतभुमी वर जन्माला येणारा प्रत्येकजण हा..भ्रष्ट योगीच आहे”.. परंतु विषयाधीन झाल्यामुळे ,या ब्रम्हमार्गापासुन जीव थोडे दुर गेले असले तरी पूर्वीच्या म्हणजेच पूर्वजन्मातील अभ्यासामुळे नि:संदेह या मार्गाकडे ओढले जाणार यात काही शंका नाही. फक्त जिज्ञासा जागृत व्हायला हवी.

महायोगाच्या साधनेबद्दल जिज्ञासा निर्माण होऊन , त्याबद्दल गोडी निर्माण व्हावी व दीक्षा घेण्यासाठीची मानसिकता तयार व्हावी यासाठी प.पू. काका महाराज यांनी जगासमोर महायोग ( सिध्दयोग ) पूर्वीभ्यास प्रणाली प्रात्यक्षिकासह मांडली. स्वानुभवातून सिध्द झालेला , प्रत्यक्ष अनुभव देणारा असा महायोग जो करण्यास अतिशय सोपा , बिन खर्चाचा आणि सर्वश्रेष्ठ मार्ग , पूर्वाभ्यास या रुपाने तो संपूर्ण जगापुढे आणला. पूर्वाभ्यास प्रतिपादनामुळे सामान्यजन महायोग/ सिध्दयोग मार्गाकडे आकर्षित होऊन दिवसेंदिवस जिज्ञासूंची संख्या वाढू लागली.त्याचबरोबर शक्तिपात दीक्षा घेणाऱ्यांची संख्याही वाढू लागली.

अतिशय सोप्या अशा ( यांमध्ये आपण काहीच करावयाचे नसते ) महायोगाच्या पूर्वाभ्यासातून लाखो लोकांनी ह्या मार्गाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे आणि घेत आहेत. महायोगातून मिळणारी अद्भुत शांतता, पुढे आश्चर्यजनक अशा, आपोआप होणाऱ्या योग क्रियांद्वारे हळूहळू व्यवहारशुध्दी ते अंत:शुध्दी घडवून आणते. व्यवहारशुध्दी अशी जी उत्तम व्यवहारच घडवून आणेल व अंत:शुध्दी अशी जी आपल्याला अविनाशी आत्मस्वरूपात स्थित करेल.

आपले शरीर,मन यांचा आधार असणारी, आपल्या सर्वांना क्षणाक्षणाला जीवनदान देणारी प्राणशक्ती हीच सर्वांची कल्याणकारी आई आहे. शुद्ध हवा या प्राण शक्तीचे शरीररूप आहे. म्हणूनच रोज नित्य , किमान ३ ते १८ मिनिटे याच, आत बाहेर होणाऱ्या प्राणशक्तीला श्रध्देने शरण जाणे व अद् भुत शांतता ,तसेच निखळ आनंदाचा अनुभव घेणे म्हणजेच महायोग पुर्वाभ्यास...

महायोग पुर्वाभ्यास
"दुर्लभं भारते जन्म!"

पूर्वजन्मातील अपूर्ण राहिलेला योगाभ्यास पूर्ण व्हावा म्हणून भारतातील प्रत्येक व्यक्तीचा जन्म झाला आहे. जीवनाच्या कृतार्थतेसाठी शक्तिपाताची ( कुंडलिनी शक्तिजागरणाची ) सर्व श्रेष्ठ ब्रह्मविद्या सर्व आबालवृध्दांना प्राप्त व्हावी व पूर्व जन्मातील अभ्यासात प्रगती व्हावी म्हणून "एक अत्यंत सोपी बिनखर्चाची पूर्वाभ्यासाची योजना ठेवीत आहोत"

१. शांतपणे डोळे मिटून आसनावर बसावे.
२. शरीर कालांतराने नष्ट होणारे आहे, परंतु आपोआप होणारा श्वासोच्छ्वास ( चैतन्य ) हेच आपले खरे चिरंतन स्वरूप आहे.
३.म्हणून शरीर अत्यंत ढिले सोडून आपोआप होणाऱ्या श्वासोच्छ्वासावर लक्ष ठेवून घडणाऱ्या क्रियांना पूर्ण स्वातंत्र्य द्यावे, अशी स्वत:च्या चैतन्याची पूजा दररोज ३ ते १८ मिनिटे करावी.
४. हा पूर्वाभ्यास जात, लिंग, वर्ण, आश्रम इ. भेदांना बाजूला ठेवून अगदी दुराचाऱ्यालाही करता येईल.
५. हा पूर्वाभ्यास रोज केल्याने आर्थिक विवंचना, भोवतालचे दुष्ट वातावरण, व्यसनाधीनता इ. हळूहळू नष्ट होईल. अंत:शुध्दी होवून मन:शांतीला प्रारंभ होईल.
६. ह्या पूर्वाभ्यासाने सर्वश्रेष्ठ शक्तिपात दीक्षेसाठी आपोआप तयारी सुरू होईल व जीवनाच्या पूर्ण कल्याणाचा मार्ग प्रगतीपथावर राहिल.
७. पूर्वाभ्यास नुसता वाचून उपयोग नाही, तो केल्याशिवाय प्रचिती नाही.

अशा या अभ्यासाने अर्थात नित्य उपासनेने आपण आपले मन या दैवी प्राणशक्तीला अर्पण करतो व या योगे दैवी शक्तीची कल्याणकारक सत्ता आपल्यामध्ये प्रस्थापित होते. हा अभ्यास आपण स्वतः करून पहावा. चमत्कारिक रित्या जीवनाच्या उच्च ध्येय प्राप्तीची आपली वाटचाल सुरू होते.

पूर्वाभ्यास कोण करवून घेऊ शकतो?

पुर्वाभ्यास करून घेणे म्हणजे शक्तीपात दीक्षा देणे नव्हे. सामान्य माणसाच्या मनात स्वतःला जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण व्हावी आणि जीवनात मुक्तीच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळावी या उद्देशाने प पू श्री नारायण काका महाराज यांनी सुरू केलेली ही एक प्रणाली आहे. ही शास्त्रोक्त आणि करायला अत्यंत सोपी आणि सर्वोच्च ध्येयाची प्रेरणा देणारी प्रक्रिया आहे.

प्रत्येक सिद्धयोगाची दीक्षा प्राप्त झालेला साधक, एखाद्या व्यक्तीला किंवा समुदायाला या मार्गाचा महिमा सांगून प्रात्यक्षिक करवून घेऊ शकतो. त्यासाठी स्वत:ची साधना नियमितपणे चालू असणे आवश्यक आहे. प.पू.श्री नारायण काका महाराज यांनी लिहिलेल्या महायोग पुस्तिके शिवाय इतर कोणतेही ज्ञान देण्याची गरज नाही.‌ त्या व्यक्तीची भूमिका केवळ संदेश वाहकासारखी (पोस्टमन) असावी. पुर्वाभ्यास पत्रकात ज्या पध्दतीने प्रात्यक्षिक करायला सांगितले आहे त्याच पध्दतीने प्रात्यक्षिक करवून घ्यायचे आहे.

श्रीसद्गुरु काका महाराज यांचा "सर्वेऽपि सिद्धयोग दीक्षिताः भवंन्तु" हा सिध्द संकल्प पूर्ण करण्यासाठी, ज्या ज्या साधकांचा सहभाग होत असतो, त्यांच्या वैयक्तिक प्रगतीसाठी तो उपयुक्त ठरतो. जो साधक पुर्वाभ्यासाचे प्रात्यक्षिक करवून घेतो, त्याला विविध प्रकारचे अनुभव येऊ लागतात आणि मार्गाची सहजता आणि महानता ही समजू लागते. त्यामुळे काका महाराज यांच्याबद्दल निष्ठा वाढीस लागते आणि साधनेत सातत्य येऊ लागते.

जरूर अनुभव घ्या....!