प.प. श्री गंगाधर तीर्थ स्वामी महाराज प.प.श्री नारायण देव तीर्थ स्वामी महाराज प.प.श्री शंकर पुरुषोत्तमतीर्थ स्वामी महाराज प.प.श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज प.पू.श्री नारायण काका महाराज
प.प. श्री गंगाधर तीर्थ स्वामी महाराज प.प.श्री नारायण देव तीर्थ स्वामी महाराज प.प.श्री शंकर पुरुषोत्तमतीर्थ स्वामी महाराज प.प.श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज प.पू.श्री नारायण काका महाराज
गॅलरी ऑडियो / व्हिडिओ माहिती
गॅलरी ऑडियो / व्हिडिओ माहिती

प्रश्नोत्तरे





प्रश्न - जीवनात आर्थिक शुचिता पाळणे कधी कधी अशक्य होऊन बसते, परिस्थिती सत्याचा आलाप करण्यास भाग पाडते, अशा वेळी काय करावे? सर्व व्यवहारच सोडून द्यावा काय ?

उत्तर- यत्ने पातक वर्जावे । घडता प्रायश्चित्त घ्यावे ॥
कोणत्याही अवस्थेत आपल्या अप्रामाणिक अवस्थेचे आपण समर्थन करता कामा नये.


प्रश्न - पापाची मला खंत वाटते, तर काय करावे ?

उत्तर- शक्यतोवर अशी परिस्थिती टाळावी. अप्रामाणिकपणाचा प्रसंग न येऊ देण्यासाठी विवेकाने आणि दक्षतेने नित्य रहावे लागते. तरीसुध्दा जेथे प्रामाणिकपणे परिस्थितीच राहू देत नाही तेथे या स्थितीची खंतच ठेवली पाहिजे. हे बरे झाले नाही याची सतत टोचणीच राहिली पाहिजे. म्हणजे पुढे असा प्रसंग निर्माण करणाऱ्या परिस्थितीला संधी देण्याचा प्रयत्न हातून होत राहील.
प्रत्येक वेळेस जर प्रायश्चित घेऊ लागलो तर शेवटी लाज वाटून पातक घडणे बंद होते. आतून पापाची खंत वाटते हेही बंद होण्याचेच लक्षण आहे. ही खंतही तीव्र होणे जरुर आहे. खंत वाटणे हीच परमार्थाची सुरुवात आहे.


प्रश्न - महाराज, बोलण्यामुळे फार घोटाळे होतात, कसे बोलावे समजत नाही.

उत्तर- फार बोलण्यामुळे फार घोटाळे होतात. तर कमी बोलावे म्हणजे घोटाळे कमी होतील. खरं म्हणजे कमीच बोलावे. आपण कितीतरी उगाचच बोलत असतो. बोलण्यामुळे शक्ती फार वाया जाते. बोलण्याची क्रिया बरीचशी निरर्थक असते. जनावरे बोलत नाहीत, झाडे बोलत नाहीत, माणूस मात्र उगाचच बडबडत असतो. निरर्थक, अवधानरहित, विसंगत असा कितीतरी भाग बोलण्यात असतो. त्यापेक्षा कमी बोलणे किती चांगले !
आपण आपल्यावर बोलण्याचे बंधन घालून घेतले तर अवधान ठेवून नेमके बोलता येवू लागते. काय बोलावे, कसे बोलावे हे कळण्यासाठी आधी बोलण्यावर बंधन घातले पाहिजे आणि बोलण्यापूर्वी त्याचा विचार केला पाहिजे. ते न बोलता कसे सांगता येईल, हे पाहिले पाहिजे. न बोलण्याचा निर्धार जितका वाढवाल तितके नेमके कळत जाईल. तरी कळल्यावरही जी बोलण्याची इच्छा होईल तीही संयमित केली की न बोलताही तुमचे जे विचार दुसऱ्यांना कळावेत असे तुम्हाला वाटते, ते कळतील.
“मौन” ही मोठी तपस्या आहे.




प्रश्न - मी पूर्वी दुसऱ्या संप्रदायात दिक्षा घेतलेली आहे. तरीसुद्धा मी महायोग दिक्षा घेऊ शकतो काय ?

उत्तर- पूर्वीच्या सदगुरुंची परवानगी घेऊन नंतर ही महायोग दिक्षा घेण्यास प्रत्यवाय नसावा, असे वाटते. पूर्वीच्या सदगुरुंची परवानगी नसल्यास मात्र इतर कोणत्याही दिक्षेची आवश्यकता नसून त्यांनी दिलेल्या मार्गानेच पूर्ण कल्याण होईल हे एक त्रिकालाबाधित सत्य समजावे.


प्रश्न - मागील बरेच वर्षांपासून मी एक उपासना करत आहे. महायोग दिक्षेनंतर ती चालूच ठेवावी की बंद करावी ?

उत्तर- महायोग दिक्षा घेतल्या नंतर पूर्वी स्विकारलेली उपासना सोडण्याचे कारण नाही. ती चालूच ठेवावी.


प्रश्न - माझा धर्म हिंदू नाही आणि माझे आचरण ही धर्माला अनुकुल नाही.मग मी ही महायोग दिक्षा घेऊ शकेल काय ?

उत्तर- महायोग दिक्षा घेण्यासाठी धर्म जात लिंग आदि भेद आड येत नाहीत. मनुष्य कितीही पापी असला तरी महायोगाचा अभ्यास करण्याची तीव्र इच्छा असेल तर अशा मनुष्याला देखिल दिक्षा होऊ शकते. म्हणजे दिक्षेनंतर तोही भगवंताच्या ब्रम्हपदाच्या प्राप्ती चा वाटेकरी होण्यास पात्र ठरू शकतो.


प्रश्न - महायोग अभ्यास केल्याने मला नेमका काय उपयोग होईल?

उत्तर- व्यावहारिक, आर्थिक अडचणी दूर व्हायला सुरुवात होईल. व्यसनाधिनता कमी होईल. चांगले व वाईट याचा विवेक जागृत होईल. मन:शांतीला सुरुवात होईल.ब्रम्ह पदाकडे वाटचाल सुरु होईल.



प्रश्न - साधनेतील प्रगती किती झाली आहे ?

उत्तर- हया मार्गतील साधना गुरुदत्त शक्तिच करत असल्याने प्रगतीवरील भार व जबाबदारी ही त्या शक्तिवरच राहते तरी देखील साधकाने डोळे मिटून जी साधना गुरूशक्तिकडून केली जाते त्याकडे लक्ष द्यावे त्यातील होणाऱ्या प्रक्रियांना पूर्ण स्वातंत्र द्यावे, शारिरीक होणाऱ्या क्रिया पुर्ण न आडता होतील अशी शरीराची अवस्था ढिली ठेवणे सर्वात महत्वाचे आहे.. प्राणांचे निरनिराळ्या प्रकारने होणारे नियमन होऊ द्यावे स्वतः त्यात काही करु नये. मनाची प्राप्त होणारी प्रत्येक अवस्था ही होऊ द्यावी त्यामुळे प्रगती निश्र्चत लवकर होईल.


प्रश्न - साधनेच्या प्रगतीसाठी काही करावे काय ?

उत्तर- ही महायोग साधना प्राण शक्तिच्या जाग्रणाची साधना आहे, म्हणून बैठकीपूर्वी भस्रिका दिर्घ श्वसन ह्यांचा निश्चित उपयोग होईल. गुरुचे एकश्रध्देने स्मरण प्रगति कारक ठरेल.
ही साधना निरंतर दृढ श्रध्देने करणे हे प्रगतीच्या द्ष्टीने उत्तम ठरेल.


प्रश्न - व्यवहारात या साधनेचा काय उपयोग होईल ?

उत्तर- मनाच समतोलपणा हा व्यवहारात आवश्यक मानला तर तो समतोलपणा राखण्याचे सामर्थ्य साधकात गुरुशक्ति निर्माण करु शकते. अनेक संकटातूनही ती तारण्याचे कार्य करते हेही अनेक साधकांच्या अनुभवाचे आहे. अनेक साधकांचा असा अनुभव ऐकला आहे की मी पण विरुध्द परिस्थितीशी साधकाला एक विशेष शांतपणा प्राप्त होते. व त्यातून तो सहीसलामत सुटतो व त्यामुळे साधनाचे महत्व त्याला पटते. व साधक साधन आधिक उस्साहाने करतो.


प्रश्न - दिक्षा घेतल्या नंतर मला मागे केलेल्या कर्मा विषयी पश्चातापाची भावना तयार झाली आहे व एक प्रकारचा अपराध भाव वाटतो आहे. काय करावे ?

उत्तर- साधने मध्ये मागील संस्कारांचा क्षय होण्यास सुरुवात झाल्याने पश्चाताप होणे साहजिकच आहे. परंतु पश्चातापाची सुरुवात म्हणजेच साधनेतील प्रगतीचे लक्षण समजावे व निशंक मनाने साधना अभ्यास चालू ठेवावा.


प्रश्न - आम्ही साधने विषयी खूप चर्चा करत असतो. हे योग्य आहे काय ?

उत्तर- एक लक्षात घ्या की हे साधन चर्चा करून समजणार नाही. त्यापेक्षा प्रत्यक्ष साधनाचा अनुभव घ्या. अनुभवाने मन शांत होईल. मग चर्चा करण्याचे कारणच राहणार नाही. मन:शांतीला सुरुवात होईल.ब्रम्ह पदाकडे वाटचाल सुरु होईल.


प्रश्न - श्रीगुरुंनी दिलेले ज्ञान मला इतरांना सांगावे वाटते. हे योग्य आहे काय ?

उत्तर- श्रीगुरुंनी दिलेले ज्ञान आत्मसात जरूर करावे परंतु ते दुसऱ्याला सांगताना" इदं न मम" असे म्हणून सांगावे. असे न केल्यास गुरुद्रोह होतो.


प्रश्न - दिक्षा घेतल्यानंतर श्रीगुरुंकडे आपल्या व्यक्तिगत इच्छा व्यक्त कराव्यात काय ?

उत्तर- श्रीगुरुकृपेचा एक भाग असा की ज्यांची श्रदधा गुरुंवर आहे त्यांनी इच्छा व्यक्त करायच्याच नाहीत. इच्छा व्यक्त न करता ही त्यांना ह्या गोष्टी जीवनात आपोआप साध्य होतील.