प.प. श्री गंगाधर तीर्थ स्वामी महाराज प.प.श्री नारायण देव तीर्थ स्वामी महाराज प.प.श्री शंकर पुरुषोत्तमतीर्थ स्वामी महाराज प.प.श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज प.पू.श्री नारायण काका महाराज
प.प. श्री गंगाधर तीर्थ स्वामी महाराज प.प.श्री नारायण देव तीर्थ स्वामी महाराज प.प.श्री शंकर पुरुषोत्तमतीर्थ स्वामी महाराज प.प.श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज प.पू.श्री नारायण काका महाराज
गॅलरी ऑडियो / व्हिडिओ माहिती
गॅलरी ऑडियो / व्हिडिओ माहिती

महायोगाबद्दल


॥ श्री श्रीगुरवे नमः ॥

ह्या भरतवर्षात अनेक शास्त्रे निर्माण झाली, परंतु मनुष्याचे जीवन कृतकृत्य होण्याचे दृष्टीने ऐहिक, परमार्थिक क्षेत्रातही उत्कृष्ट प्रगती प्राप्त होण्यासाठी, जगातील प्रत्येक मनुष्यमात्र अत्यंत सहजपणे करू शकेल व महान अनुभव प्रत्यक्षपणे स्वतः घेऊ शकेल असा स्वयंसिध्द झालेला महायोग ( सिद्धयोग - शक्त़िपातयोग - कुंडलिनी शक्त़ि जागरण योग) ही श्रेष्ठ योगविद्या अलिकडे लोकांना माहित होत आहे. ह्या सिद्धयोगामुळे मनाचे संतुलन सांभाळणे सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सोपे होते.

सिद्धयोग हा वेदप्रतिपाद्य मार्ग आहे. ॐ नमोजी आद्यावेदप्रतिपाद्या। जय जय स्वसंवेद्या ।। असे संतशिरोमणी श्री ज्ञानेश्वरमहाराजांनी ज्ञानेश्वरीत पहिल्याच ओवीत म्हटले आहे.वेदप्रतिपाद्य म्हणजे वेदांनी सांगितलेली व प्रत्येक व्यक्तीसअनुभवाला येणारी स्वसंवेद्य अशी विद्या सर्वसामान्यांना सहज समजावी म्हणून ज्ञानेश्वरीतून प्रगट केली.

सिद्धयोग हा श्रीमद्भगवद्गीता प्रणित मार्ग आहे. म्हणूनच गीतेतील प्रत्येक अध्यायाचे शेवटी ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषदसु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे. श्रीकृष्णार्जुन संवादे.....नाम अध्याय: असे म्हटले आहे. भगवान श्रीकृष्णांनी गीतेच्या ९ व्या अध्यायात दुसऱ्या श्लोकांत ह्या मार्गाचे वर्णन चपलखपणे केलेले आहे.

राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तम ।
प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तृमव्ययम् ॥

सिद्धयोगविद्या ही राजविद्या आहे. राज विद्या म्हणजे विद्यानाम् राजा सर्वश्रेष्ठ विद्या. गुह्यनाम् राजा, अगदी टॉप सिक्रेट ह्या सिद्धयोगात शक्त़िजागरणाचा अनुभव स्वतःला घेता येतो. प्रत्यक्षावगमं यामुळे जीवन उन्नत होईल, परिपूर्ण होईल. एवढे सगळे श्रेष्ठत्व सांगून श्रीभगवान म्हणतात ते सुसुखं कर्तृम्ं आहे म्हणजे ते करण्यास अत्यंत सोपे आहे, की जे कोणीही सहजपणे करू शकेल.
योग म्हटला की आपल्या डोळ्यासमोर आसने, प्राणायाम, बंध, मुद्रा अशा गोष्टी उभ्या राहतात व ह्या अवघड गोष्टी आपल्याला कशा जमतील असे मनात येते. परंतु हा सिद्धयोग तसा नाही. यात सिद्धता करण्याची आवश्यकता नाही,कारण त्यात आपण स्वत: काहीच करायचे नाही. ह्यापेक्षा सोपे काय असु शकते यात सर्व गोष्टी आपोआप होत राहतात. आपोआप हा सिद्धयोग साधनेचा Key Word आहे. सिद्धयोगात सद्गुरुंच्या सिद्धसंकल्पामुळे साधकाला निरनिराळे अनुभव आपोआप येत राहतात. साधकाची जी बाहा प्रवृत्ती असते. ती सदगुरुंच्या कृपेमुळे अंतर्मुख होऊ लागते व पाठीच्या मणक्यांतून (मूलाधारापासून) सुषुम्ना नाडीमार्गे प्राणरूपी प्रवाह सहस्त्रारापर्यंत ऊर्ध्वगामी होतो व साधकाला विविध प्रकारचे आश्वर्यकारक दिव्य अनुभव आपोआप येऊ लागतात.सिद्धयोगाची दीक्षा झाल्यावर कुंडलिनी शक्त़िजागरण होते व सर्व गोष्टी ती भगवद्शक्त़िच आपणांकडून करवून घेते.

म्हणूनच जीवनाची कृतार्थता साधण्यासाठी युद्धभूमीवर देखील भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश केला की "तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मातेऽधिक कर्मिभ्यश्वाधिको योगी तस्माद्योगी भवार्जुन ॥" (६/४६)
तपस्वी लोकांपेक्षा, ज्ञानीमनुष्यापेक्षा, यज्ञयागादि दानादी उत्कृष्ट कर्में करण्याहून योगी हा श्रेष्ठ आहे. म्हणून "योगी होईं अंतःकरणें । पंडुकुमरा ॥६-४८१॥" असे श्रीकृष्ण म्हणतात.
श्रीमद् पूज्यपाद श्री आद्यशंकराचार्य महाराजांनी गीतेच्या ६ व्या अध्यायात २५ व्या श्लोकावर भाष्य करतांना ह्या सिद्धयोगाचे महात्म्य एष योगस्य परमो विधी म्हणजे हा योगाचा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. अशा प्रकारे सांगितले आहे.

जगातील सर्व सुखे ही मनुष्याच्या बाहेरील वस्तुंवरआधारीत आहेत परंतु अध्यात्मिक सुख हे या वस्तुंपैकी काहीही जवळ नसतांना आनंद देणारे असते त्याला आत्मानंद म्हणतात. असा आत्मानंद प्रदान करणारा हा अनन्यसाधारण मार्ग आहे. ह्या मार्गात सदगुरुंच्या कृपेने मूळच्या शक्त़िवरील आवरणे नष्ट होऊन मूळ स्वरूपाशी तन्मय होणे घडते. शक्त़िजागृतीमुळे प्राण उर्ध्वगामी होतो व मन आणि प्राण या दोघांचाही पूर्ण लय होतो. सिद्धयोग व इतर योगमार्ग यांमध्ये महत्त्वाचा फरक म्हणजे इतर मार्ग परिश्रम साध्य आहेत. परंतु सिद्धयोगात हठ, मंत्र, लय, राज या चारही प्रकारच्या योगातील क्रिया साधकाचे शरीर, मन व पूर्वीचे संस्कार यांना जी पद्धत व जो प्रकार आवश्यक असेल त्याप्रमाणे होत जातात. व्यक्तीच्या संपूर्ण शुद्धीसाठी एक अगर चारही योग प्रकारांचा उपयोग शक्त़ी स्वत:च करेल.

ह्या सिद्धयोगाचा अभ्यास म्हणजे सदासर्वकाळ साम्यावस्थेत राहण्याचा मनाचा अभ्यास होय. समत्वंयोग उच्चते। सिद्धयोगात बाह्य व्यावहारिक भेदांना महत्व नाही. येथे धर्म, जात, देश, वर्ण, स्त्री-पुरुष, लहान-मोठा असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव ही सिद्धयोगदीक्षा घेण्यास करत नाही.एवढेच कशाला, मनुष्य कितीही पापी असला, दुराचारी असला,तरी सिध्दयोग दीक्षा तीव्र इच्छा असल्यास त्यालाही होऊ शकते,म्हणूनच भगवद् गीतेत ९ व्या अध्यायाच्या ३० व्या श्लोकात म्हटले की,

अपिचेत्सुदराचारो भजते मामन्यभाक् |
साधुरेव स मन्तव्य: सम्यग्व्यवसितो हि सः ॥

सिद्धयोगाच्या या अभ्यासात सद्गुरुंची संकल्पयुक्त प्राणशक्त़ि हेच प्रमुख दैवत असून त्या प्राणाची उपासना म्हणजेच सदगुरुंची कृपा होण्याकरिता झालेले प्रयत्न होत. प्राण म्हणजेच व्यावहारिक भाषेत आपोआप होणारा श्रासोश्चवास, हा सर्वाना माहित असल्यामुळे त्याची महती सहज पटण्याजोगी आहे, प्राण सर्व जगाचेच चिरंतन तत्व आहे. प्राणरूपी सूर्य हा शाश्चत, सत्यआणि चिरंतन तत्त्वाचा अविष्कार असल्यामुळे त्याची उपासना श्रेष्ठ व ग्राह्य आहे. मनापेक्षा प्राणतत्व श्रेष्ठ असल्यामुळे प्राण हाच सर्वजगाचा एकमेव धर्म आहे. हे निर्विवाद सत्य मानावे लागते. प्राण चैतन्य हाच जगाचा एकमेव धर्म असून बाकी सर्व उपासना पद्धती आहेत.

शक्त़िजागरण होणे यालाच शक्त़िपात वा वेधदीक्षा म्हणतात. सद्गुरु स्पर्शाने, मंत्राने, दृष्टीने किंवा संकल्पाने श्रद्धायुक्त शिष्याच्या ठिकाणी शक्त़िचा संचार करतात. या चारही प्रकारात संकल्प हाच मुख्य भाग असून एका दृष्टीने उरलेले तीनहीं बाह्यप्रकार आहेत. ज्या शिष्यास कोणत्याही कारणाने सदगुरुंची प्रत्यक्ष भेट शक्य नसेल तरी पत्राद्वारेही दीक्षा दिल्यानंतर श्रद्धायुक्त अंत:करणाच्या साधकाला दूर अंतरावरुनही दीक्षा होऊ शकते. फॅक्स मेसेज पाठवून सद्गुरुंनी साधकाला दीक्षा दिल्याची उदाहरणे घडली आहेत की ज्याद्वारे दीक्षा मिळून साधकाला अद्भुत अनुभव प्राप्त झालेले आहेत.

ह्या मार्गात दीक्षेनंतर साधकांना आपोआप आश्वर्यकारक अनुभव येतात वा मनप्राणेंद्रियाच्या क्रिया व्हावयास लागतात. कोणास कोणते अनुभव येतील हे भगवती कुंडलिनी शक्त़िच्या हातात असते. प्रत्येकाला निरनिराळे अनुभव येतात. दीक्षा घेण्याचे दिवशी किंवा कालांतरानेही अनुभव येतात.

भगवद्गीतेतील ६ व्या अध्यायातील २५ व्या श्लोकांत ह्या सिद्धयोगाच्या मार्गाचे तत्त्व व प्रात्यक्षिक या दोन्हीची माहिती भगवंतांनी सांगितली आहे.

शनै: शनैरूपरमेद बुद्ध्या धृतिगृहीतया ।
आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिन्तयेत ||

धैर्ययुक्त बुद्धिने हळूहळू मन आत्मस्वरूपाचे ठिकाणी स्थिर करावे, इतर कशाचेही चिंतन करू नये. योगवासिष्ठांतील स्पष्टीकरणाप्रमाणे 'ब्रह्मपद' हे एक नाणे मानले तर आत्मचिंतन व प्राणचिंतन या नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणून'आत्मसंस्थेऐवजी' 'प्राणसंस्था' हे अभ्यासाचे दृष्टीने सोपे जाईल. म्हणून साधनेचे वेळी आपोआप होणाऱ्या श्वासोच्छवासादी क्रियांवर मन लावावे.

हा सिद्धयोगाचा, शक्त़िपातविद्येचा मार्ग सर्व तळागाळातील लोकांना शाश्वत सुखावह व प्रकाशदायी होऊन त्यांच्या जीवनाचा स्तर उंचावल्याशिवाय राहणार नाही हे त्रिकालाबाधीत सत्य असून अनुभवाला येते.

प्रत्येक व्यक्ति ही सामान्यत: सत्य, रज, तम या तीन गुणाशी संलग्न राहूनच कर्म करीत असते. परंतु गीतेत भगवंतांनीअर्जुनाला निस्तैगुण्यो भवार्जुन 'तूं त्रिगुणातीत हो' असे सांगितल्याप्रमाणे हा सिद्धयोग मार्गामध्ये सर्वसमर्पण भावनेने देहभावाचे विस्मरण होऊन मनाची स्थिरता होऊ लागल्याने दीक्षोत्तर साधकाला हळूहळू त्रिगुणातीत अवस्था प्राप्त होते.होणाऱ्या क्रियांना पूर्ण स्वातंत्र्य दिल्याने चैतन्यशक्त़िचे ठिकाणी भक्ति होईल - ही आत्मनिवेदनस्वरूप सर्वश्रेष्ठ भक्ति होईल. हेआत्मपूजन आहे. शक्त़िला सर्वसमर्पण भावाने शरण जावयाचेव जे शक्त़ी करेल त्याप्रमाणे होऊ द्यावयाचे. क्रिया स्वरूपाने शक्त़ी स्वत:च पूजन करेल. पूर्णता प्राप्त होईपर्यंत ही साधनाअखंड चालू राहते. पूर्वसंस्कारामुळे एखाद्या व्यक्तिची साधना अपुरी राहिली तरी त्याचे निराकरण पुढील जन्मामध्ये होऊ शकते. मार्गात कदाचित थांबावे लागेल, पण परत फिरण्याचे कारण नाही. या सिद्धयोगात परतीचे तिकीट नाही.

या दीक्षेचा प्रभाव म्हणून शरीरस्थ नाड्यांची शुद्धी तर होतेच परंतु अंतःशुद्धीचा प्रसार म्हणून बाह्यजीवनावरही उत्तम परिणाम होऊन सर्व प्रश्नांची उकल झाल्याचेही दृष्टोत्पत्तीस येते.भगवतीची कृपा प्राप्त झाल्यावर अनेक अशक्यप्राय गोष्टी साधकांच्या जीवनात घड़तात, असा अनेकांचा अनुभव आहे.हे सर्व कुंडलिनी जागरणाचे बाहेरील फायदेही दिसून येतात.